पाकिस्तान: साखर साठेबाजी, काळाबाजाराविरोधात कडक कारवाई

लाहोर : पाकिस्तानमध्ये साखरेचा काळाबाजार आणि साठेबाजी रोखण्यासाठी कडक पावले उचलली जात आहेत. लाहोरजवळ एका गोदामातून २२,००० पोती साखर जप्त करण्यात आली. या साखरेची किंमत १५० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे सांगितले जाते. यापूर्वी शुक्रवारी किरकोळ बाजारात साखरेचा दर वाढून १५० रुपये प्रती किलोवर पोहोचला. या आठवड्यात साखरेचे दर ४५ रुपयांनी वाढले आहेत. मुरीदके आणि सादिकाबादमध्ये अन्न विभाग आणि जिल्हा प्रशासनाने छापे टाकले. अफगाणीस्तानमध्ये साखर तस्करी करण्यासाठी मु्ख्य रस्त्यालगत ठेवलेली ६,००० पोती साखर जप्त करण्यात आली. ही साखर चार कोटी रुपयांची असल्याचे नंतर स्पष्ट झाले.

साखरेच्या साठेबाजी करणाऱ्यांविरोधा अन्न सचिवांनी इशारा दिला आहे. साठेबाज आणि तस्करांना जबाबदार धरले जाईल. साठेबाजीत सहभागी सर्वांवर कारवाई होईल. संबंधित यंत्रणेद्वारे एमपीओअंतर्गत तुरुंगवास भोगावा लागेल. ज्या लोकांनी देशात १५० रुपये प्रती किलो साखर दर करण्याचा कट रचला आहे, त्यांना तुरुंगात टाकू असा इशारा त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here