पाकिस्तानात साखरेच्या किंमती मोठया प्रमाणात वाढत आहेत, या किंमती कमी करण्यासाठी सरकार अनेक प्रयत्न करीत आहे. देशातील साखर मूल्यात होणाऱ्या वृध्दीबाबत बैठकही बोलवण्यात आली होती, ज्यामध्ये सरकारने साखर उद्योगाशी संम्बाधिताना चेतावणी दिली की, जर घरगुती बाजारात साखरेच्या किंमती अशाच वाढत राहिल्या तर, निर्यातीवर प्रतिबंध घालावा लागेल. वाणिज्य, कपडा, उद्योग आणि उत्पादन या विषयांवर प्रधानमंत्र्यांचे सल्लागार अब्दुल रजाक दाऊद यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक घेण्यात आली.
गेल्या दोन महिन्यामध्ये, देशात साखर किमतीत वाढ झाली, कारण रमजान मध्ये नागरीकांसाठी ५४ रुपये प्रति किलो साखर उपलब्ध होती. मूल्य निरिक्षण समिती ने त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत साखरेच्या वाढलेल्या किंमतीबाबत चिंता व्यक्त केली. खुल्या बाजारात साखरेच्या किमती कमी करण्यासाठी सरकारने पहिल्यांदा संभागीय आयुकतांना निर्देश दिले होते. अहवालानुसार, ठोक बाजारात साखरेची किंमत ७६ रुपये प्रति किलोपर्यंत आहे. साखरेच्या किमती कमी करण्यासाठी रावळपिंडी मध्ये जिल्हा प्रशासनाने बाजारात साखरेची किंमत ७४ रुपये प्रति किलो इतकी निश्चित केली होती आणि यासाठी बाजारात छापेमारी करण्याची घोषणाही केली होती.
जूनमध्ये पाकिस्तान सरकारने ३ .३० रुपये रुपये प्रति किलो साखरेवर कर सादर केला. यानंतर असे समजले की, बाजारात साखर अत्याधिक दरामध्ये विकली जात आहे. त्याचबरोबर, बेकायदेशीर साखरेच्या तक्रारीनंंतर, सरकारने यावर कारवाई सुरु केली आणि साखरेची हजारो बेकायदेशीर पोती जप्त केली.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.