लाहोर : ऊस गाळप हंगाम सुरु होण्यापूर्वी पाकिस्तानात 40 साखर कारखानदारांना कारखान्यांमध्ये स्वच्छता ठेवण्याबाबत नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. प्रांतव्यापी तपासणीच्या आधारे हे आदेश पंजाब फूड अॅथोरिटीने (पीएफए) दिले आहेत.
पीएफए चे महासंचालक इरफान मेमन म्हणाले, साखर कारखान्यांची तपासणी पूर्ण केल्यानंतर हा आदेश जारी करण्यात आला आहे. प्राधिकरणाच्या खाद्य सुरक्षा पथकांनी पंजाबमधील 41 साखर कारखान्यांना भेट दिली. त्यापैकी एक कारखाना बंद असल्याचे त्यांना आढळून आले. हा परिसर भेसळमुक्त करण्यासाठी प्राधिकरण भेसळ करणार्यांविरुद्ध करवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.