लाहोर, पाकिस्तान : पाकिस्तानातील पंजाबच्या ऊस आयुक्तांनी, गुरुवारी ऊस शेतकर्याचे 395.7 दशलक्ष रुपये न भागवल्याने दोन साखर कारखान्यांच्या मालकांना अटक करण्याचे आदेश दिले आहेत. ऊस आयुक्तांनी ओकरा आणि झांग च्या डिप्टी कमिश्नरांना ऊस शेतकर्यांच्या थकबाकी बाबत कारवाई करण्याचे आदेश दिले.
गेल्या गाळप हंगामातील ऊस शेतकर्यांची क्रमश: दोन कारखान्यांकडून 290 दशलक्ष आणि 105.7 दशलक्ष थकबाकी होती. यापूर्वी, कारखान्यांना ऊस शेतकर्यांचे पैसे भागवण्यासाठी नोटीस पाठवण्यात आल्या होत्या आणि इशारा देण्यात आला होता की, थकबाकी न भागवल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल.