पेशावर : पेशावरमध्ये भाजीपाला आणि फळांच्या किमतीत वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसेंदिवस वाढत्या महागाईने जनता मेटाकुटीला आळी आहे. स्थानिक भाजीपाला व फळ बाजारात आले 860 रुपये किलो, लसूण 320 रुपये किलो, तर लिंबू 160 रुपये किलोने विकले जात होते. कांदा 50 रुपये, टोमॅटो 30 रुपये, हिरवी मिरची 100 रुपये, भेंडी 90 रुपये आणि वाटाणा 230 रुपये किलो आहे. बटाटा 100 रुपये, तरूळ (कचलू) 150 रुपये, फ्लॉवर 120 रुपये आणि तेंदे 90 रुपये किलो दराने विकले जात होते.
सफरचंद 450 रुपये किलो, आंबा 220 रुपये आणि लिचीचा दर 360 रुपये किलो राहिला आहे. याशिवाय चेरी ३६० रुपये, पर्सिमॉन ३४० रुपये आणि केळी २१० रुपये डझन दराने विकली जात होती. दरम्यान, जिवंत कोंबडीचा दर 455 रुपये किलोवर पोहोचला आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. सरकारने वाढत्या महागाईपासून तत्काळ दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.