पाकिस्तानातून कच्ची साखर आयात करून देशातील साखरेचे दर पाडले – राजू शेट्टी

फलटण : ‘पाकिस्तानवर टीका करताना, त्यांच्यावर कारवाई केल्यावर सर्वांचीच छाती फुगते; मात्र छप्पन इंच छाती असलेल्यांनी पाकिस्तानमधून साखर आयात करताना हा विचार का केला नाही. कमी दरात कच्ची साखर आयात करून देशात उत्पादित साखरेचे दर पाडले. केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दळभद्र्री धोरण शेतकरी विरोधी आहे. यामुळे शेतकऱ्यांसह आम्हालाही ‘अच्छे दिनाच्या शोधात लुच्छे दिन आले आहेत,’ अशी टीका खासदार राजू शेट्टी यांनी केली.साखरवाडी येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आयोजित आक्रोश मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र ढवाण (पाटील), महाराष्ट्र प्रदेश युवा आघाडीचे अध्यक्ष अमर कदम, युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, डॉ. रवींद्र घाडगे, फलटण तालुकाध्यक्ष नितीन यादव, शहराध्यक्ष सचिन खानविलकर, अनिल पिसाळ उपस्थित होते.राजू शेट्टी म्हणाले, ‘केंद्र व राज्य सरकारने टोमॅटोचे भाव आपल्या देशात दर एक ते दीड रुपये असताना पाकिस्तानमध्ये टोमॅटो तीनशे रुपयांपर्यंत पोहोचला. यावेळी काही शेतकºयांनी टोमॅटो पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने भारतातील टोमॅटो येऊ न देण्यासाठी ठिकठिकाणी चौक्या लावल्या. यामुळे आपल्या देशातील शेतकºयांना हा टोमॅटो रस्त्यावर फेकून द्यावा लागला होता. सरकार शेतकºयांचेच सर्जिकल स्ट्राइक करीत असून, आता आपले उसाचे पैसे व दुधाचे पाच रुपये अनुदान घेतल्याशिवाय केंद्रासह राज्यातील एकाही मंत्र्याला रस्त्यावर फिरून देणार नाही,’ असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

कारखानदार साखर उताºयाची एका बाजूला चोरी करतात व दुसºया बाजूला साखर उताºयातील चोरीची साखर काळ्या बाजारात विकून त्याचे सर्व पैसे हडप करतात. यामुळे साखर उतारा कमी दाखवून ऊस उत्पादकांची दिशाभूल करतात. उतारा कमी का झाला? याचा जाब शेतकरी विचारत नाहीत, यामुळे साखर धंद्यात पांढरे बोके काळी कमाई करून शेतकºयांना लुबाडत आहेत. शेतकरी मात्र कर्जात अडकला आहे.

एकीकडे कामगार मिळत नसल्याने काही वेळेला ऊस तोडणीसाठी पैसे द्यावे लागतात. यामुळे शेतकºयांच्या मुलांनी एकत्र येऊन ऊसतोडीच्या मशिनरी खरेदी केल्या. मात्र यासाठी अनुदान मिळत नसल्याने तेही आता अडचणीत आले.

SOURCELokmat

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here