पाकिस्तान : खासगी कारखान्याकडून २२०० पोती साखर जप्त

बुरेवाला, पाकिस्तान : जिल्हा प्रशासनाने साठेबाजी करुन ठेवण्यात आलेली २२०० पोती साखर जप्त केली आहेत. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक आयुक्तांच्या नेतृत्वाखालील पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, सर्वर खान यांच्या मालकीच्या एका खासगी साखर कारखान्यावर छापा टाकला. यावेळी जवळपास २२०० पोती साखर जप्त करण्यात आली.

प्रशासनाने घटनास्थळी साखर कारखान्याला कुलूप ठोकून कायदेशीर कारवाई सुरू केी आहे. यावेळी सहाय्यक आयुक्त म्हणाले की, साठेबाजी करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जात आहे. चढ्या दराने साखर विक्री सहन केली जाणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here