पाकिस्तानकडून चार वर्षानंतर अफगाणिस्तानला साखर निर्यात सुरू

खैबर : पाकिस्तानकडून चार वर्षांच्या खंडानंतर पुन्हा अफगाणिस्तानला साखर निर्यात सुरू झाली आहे. गेल्या चार दिवसांत ४०० हून अधिक वाहनांनी तोरखाम सीमा ओलांडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानने अलीकडेच अफगाणिस्तानला १,५०,००० टन साखर निर्यात करण्याची परवानगी दिली आहे आणि शिपमेंट प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतची अंतिम मुदत दिली आहे.

तोरखममधील कस्टम क्लिअरिंग एजंट्सने डॉनला दिलेल्या माहितीनुसार, चार दिवसांपूर्वी अफगाणिस्तानात सुमारे १०० वाहने, प्रत्येकी ३३ टन साखर दाखल झाली होती. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने चार वर्षांपूर्वी साखर निर्यातीवर बंदी घातली होती. आता देशातील साखरेच्या टंचाईवर मात करून दर नियंत्रणात आणले.

साखर तस्करी रोखण्यासाठी खैबर आदिवासी जिल्हा प्रशासनाने पोलिसांसह पेशावर-तोरखम महामार्गावर अनेक चौक्या उभारल्या आहेत. बंदी लागू झाल्यानंतर, तोरखाम आणि लेंडी कोटल येथील गोदामांमधून मोठ्या प्रमाणात साखर जप्त करून अनेक साखर तस्करांना अटक केली होती. तथापि, साखरेची तस्करी रोखण्यात अधिकारी अयशस्वी ठरले. कारण व्यापारी तरुण, अल्पवयीन मजूर आणि हमाल वापरून, बेकायदेशीरपणे साखर सीमेपलीकडे पाठवण्यासाठी विविध पद्धतींचा वापर करीत राहिले.

बंदी उठवल्याने साखर निर्यातदार आणि वाहतुकदारांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. कारण बंदीच्या काळात त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, तोरखममधील कस्टम क्लिअरिंग एजंट आणि फळ आयातदारांनी डॉनला सांगितले की, अफगाणिस्तानातून दररोज १००-११५ वाहने फळे आणि भाजीपाला घेऊन पाकिस्तानात पोहोचत आहेत.

अफगाणिस्तानातून फळे आणि भाजीपाला आयात केला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, गेल्या दोन-तीन दिवसांपासून शेकडो रिकामी अफगाण वाहने पाकिस्तानच्या सीमेवर अडकून पडली आहेत. तोरखम आणि लेंडी कोटल येथील वाहतूकदारांनी डॉनला सांगितले की, टीएडी नसलेल्या अफगाण ड्रायव्हर्सना दोन्ही देशांच्या व्यापार आणि सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये सहमती दर्शविल्यानुसार व्यापार माल वाहून नेण्याची परवानगी नाही. पाकिस्तानी वाहतूकदारांनाही आवश्यक कागदपत्रांशिवाय अफगाणिस्तानमधून माल आयात करण्याची परवानगी नाही, असे ते म्हणाले.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानने ज्यांच्याकडे ठराविक कालावधीसाठी काम करण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्ट नाही अशा दोन्ही बाजूंच्या वाहतूकदारांना टीएडी देण्याचे मान्य केले होते. सहा महिन्यांच्या टीएडीसाठी १०० डॉलर शुल्क जमा करण्याव्यतिरिक्त वाहतूकदारांना त्यांचे राष्ट्रीय ओळखपत्र, वाहन नोंदणी क्रमांक आणि नवीनतम छायाचित्रे दाखवणे आवश्यक होते. यापूर्वी, दोन्ही देशांनी वैध प्रवासी कागदपत्रांशिवाय वाहतूकदारांच्या प्रवेशावर बंदी घातली होती.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here