पाकिस्तान – साखरेची महागाई रोखण्यासाठी पावले उचलू : उद्योग तथा उत्पादन मंत्री राणा तन्वीर

इस्लामाबाद : साखरेची कृत्रिम टंचाई आणि महागाई संपवण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे उद्योग आणि उत्पादन मंत्री राणा तन्वीर हुसेन यांनी सांगितले. शुक्रवारी इस्लामाबादमध्ये साखर सल्लागार मंडळाच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवताना उद्योग आणि उत्पादन मंत्री राणा तन्वीर हुसेन यांनी स्पष्ट केले की, साखरेच्या किमती वाजवी पातळीवर ठेवण्यासाठी संघीय सरकार प्रांतांसोबत समन्वयाने कामकाज करेल. बैठकीत सांगण्यात आले की बाजारात साखर वाजवी दरात उपलब्ध आहे. तर रमजानसाठी साखरेचे दर निश्चित करण्यासाठी सोमवारी बैठक बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here