इस्लामाबाद : पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशन (PSMA) ने सरकारद्वारे निश्चित करण्यात आलेल्या साखरेच्या एक्स मील आणि किरकोळ दर नामंजूर केला आहे. साखर कारखानदारांनी साखरेच्या किमतीबाबत सरकारच्या निर्णयाला अपिलिय समितीत आव्हान दिले आहे.
कारखानदारांच्या म्हणण्यानुसार, साखरेची किंमत ११५ रुपये ते १२० रुपये प्रती किलो आहे. आणि ते १०० रुपयांपेक्षा कमी दरात विक्री करू शकत नाहीत. अपिलिय समितीने जर आपली याचिका नामंजूर केले तर आम्ही कोर्टात जावू असा इशारा त्यांनी दिला. गेल्या काही आठवड्यात देशात साखरेच्या किरकोळ किमतीत अभुतपूर्व ३० टक्के वाढ झाली आहे आणि महागाई रोखण्यासाठी सरकारने किरकोळ दर ९८.८२ रुपये प्रती किलो निश्चित करण्यात आली आहे.