इस्लामाबाद : पाकिस्तानच्या प्रतिस्पर्धा आयोगाने (सीसीपी) पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनला (पीएसएमए) ४४ अब्ज रुपयांचा दंड ठोठावला आहे. सीसीपीने जारी केलेल्या निवेदनानुसार, पीएसएमएने दोन महिन्यात दंड भरावा असे निर्देश देण्यात आले आहेत. साखरेचे दर निश्चित करताना प्रतिस्पर्धा अधिनियम २०१० चे उल्लेघन केल्याचा आरोप कर पीएएमएवर हा दंड लागू करण्यात आला आहे.
सीसीपीद्वारे केलेल्या एका चौकशीत पीएसएमएअनुसार साखर कारखान्यांनी युटिलीटी स्टोअर्सचा कोटा मिळवला आणि साखर आयात तडजोडीनंतर केली. सीसीपीच्या दोन सदस्यांनी आयोगाच्या निर्णयावर असहमती व्यक्त केली असेही निवेदनात म्हटले आहे. मात्र, अध्यक्ष आणि आणखी एका सदस्याने पीएसएमएवर दंड ठोठावण्याच्या बाजूने मतदान केले. पीएसएमएला सीसीपीने ठोठावलेला दंड हा आजवर सर्वाधिक आहे.
गेल्या वर्षी देशात साखरेचे संकट निर्माण झाले होते. त्यामुळे साखरेचे दर गगनाला भिडले होते. सीसीपीने या प्रकरणाचा तपास करून अनेक साखर कारखान्यांना नोटिसा जारी केल्या होत्या. साखर तपासणी आयोगाने आपला अहवाल सादर केल्यानंतर सीसीपीला साखर उद्योगात गटबाजी आणि प्रतिस्पर्धा विरोधी उपोयांबाबतच्या मुद्यांची तपासणी करण्यास सांगण्यात आले होते. दुसरीकडे पीएसएमएने तपासणी आयोगाचा अहवालच रद्दबातल ठरवला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link