पाकिस्तान: आयातीनंतर साखरेच्या दरावर नियंत्रण शक्य

इस्लामाबाद : आयात केलेली साखर लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. त्यानंतर साखरेच्या किमती कमी होतील अशी शक्यता आहे. त्यातून वाढत्या महागाईने त्रस्त झालेल्या ग्राहकांना दिलासा मिळेल असे उद्योग आणि उत्पादन मंत्री हम्माद अजहर यांनी सांगितले. मंत्री अजहर यांनी राष्ट्रीय दर नियंत्रण समितीला (एनपीएमसी) सांगितले की, साखरेच्या किरकोळ दरात गेल्या आठवडाभरात घट दिसून आली आहे. लवकरच आयात केलेली साखर उपलब्ध होणार असल्याने घरगुती बाजारपेठेतही साखरेच्या किमती आणखी कमी होतील. पामतेल आणि सोयाबीनच्या किमतीतही आंतरराष्ट्रीय स्तरावर घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारपेठांतील खाद्यतेलाचे दर कमी होऊन दबाव कमी होईल असेही मंत्री अजहर यांनी सांगितले.

एनपीएमसीच्या बैठकीचे अध्यक्ष अर्थ आणि महसूल मंत्री हफीज शेख म्हणाले, जनतेला परवडणाऱ्या दरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा व्हावा यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे. एनपीएमसीने आठवड्यातील गहू, साखर, खाद्यतेलाच्या दरातील वाढीचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here