हैदराबाद : गेल्या गळीत हंगामाच्या, २०१९-२० या तुलनेत या हंगामात ऊसाचे गाळप जास्त करून साखर उत्पादन जादा होण्याचा अंदाज आहे. मात्र, ग्राहकांना साखरेच्या दरात दिलासा मिळण्याची स्थिती नाही. आगामी काही दिवसांत साखर प्रतिकिलो १०० रुपये या दराने मिळेल अशी शक्यता आहे.
पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनचे (पीएसएमए) अध्यक्ष अहमद बवानी यांनी शेतकऱ्यांना दिला जाणारा ऊस दर हाच साखरेच्या दरवाढीला कारणीभूत आहे असा आरोप केला. साखरेच्याएकूण उत्पादन खर्चाच्या तुलनेत शेतकऱ्यांना ७३ टक्के पैसे दिले जातात असा दावा त्यांनी केला.
अध्यक्ष बवानी म्हणाले, पाकिस्तानमध्ये या हंगाात ऊसाचा दर प्रति ४० किलोसाठी २७५ रुपये आहे. सिंध प्रांतामध्ये हा दर सरासरी ३०० रुपये, मध्य सिंध भागात २५० आणि उर्वरीत सिंध क्षेत्रात २५० रुपये आहे. सिंध सरकारने उसाला प्रति किलो ४० रुपये दर निश्चित केला होता. पंजाब प्रांतानंतर सिंध विभाग हा सर्वात मोठा ऊस उत्पादक आहे. देशात एकूण ८४ साखर कारखाने आहेत. त्यापैकी ३८ कारखाने सिंधमध्ये आहेत. सुरुवातीला ३२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले. मात्र, साखरेच्या उताऱ्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत ०.३ ते ०.४ टक्के घट आल्याचे बवानी यांनी सांगितले.
सिंध पीएसएमए प्रमुखांनी सांगितले की, आगामी काही काळात साखरेचे कारखान्याबाहेरील दर ९३ ते ९५ रुपये प्रतिकिलोपर्यंत पहोचतील. त्यामुळे किरकोळ बाजारातील दर १०० रुपये प्रतिकिलोपेक्षाही अधिक होतील अशी शक्यता आहे. उत्पादन खर्चाच्या तुलनेत साखर आणखी महाग होऊ शकेल अशी शक्यता असल्याचे ते म्हणाले.