पाकिस्तान: बलुचिस्तानमध्ये साखरेचे दर पुन्हा गगनाला भिडले

इस्लामाबाद : बलुचिस्तानची राजधानी क्वेटासह राज्यातील विविध जिल्ह्यांत साखर आणि आट्याच्या किमती पुन्हा एकदा गगनाला भिडल्या आहेत, असे वृत्त पाकिस्तानातील स्थानिक प्रसार माध्यमांनी दिले आहे. गरीबीशी झुंजत असलेल्या बलुचिस्तानमध्ये अनेक जिल्ह्यांत साखर आणि आट्याच्या किमतीत तेजी दिसून येत आहे. क्वेटासह विविध जिल्ह्यात साखर पाकिस्तानी १३० रुपयांपासून २०० रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. तर प्रती २० किलो आटा २६०० रुपये ते ४००० रुपये या दराने विकला जात आहे. साखरेचा सर्वाधिक दर दालबंदिनमध्ये २०० पाकिस्तानी रुपये किलो आहे. तर आट्याचा सर्वाधिक दर सहाबतपुरमध्ये ४००० रुपये प्रती २० किलो नोंदवला गेला आहे.

पाकिस्तान रमजानच्या काळातही आट्याच्या संकटाशी झुंज देत आहे आणि याची टंचाई कायम आहे. यापूर्वी मे महिन्यात पाकिस्तानच्या आटा मिल्स असोसिएशनने सर्व कारखाने बेमुदत बंद करण्याची घोषणा केली होती. फ्लोअर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष चौधरी आमिर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, आटा गिरण्या गुरुवारी सायंकाळी सात वाजता बेमुदत बंद आंदोलन सुरू करतील. कारण, सरकारच्या अन्न विभागाने आमची फसवणूक केली आहे. ते म्हणाले की, सिंधमधून कचारीमध्ये गव्हाच्या आकवेवर निर्बंध लागू केल्याने आटा गिरण्यांनी संप पुकारला होता, तेव्हा प्रांतीय अन्न मंत्र्यांनी पाच लाख पोती गव्हाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. हा गहू कराचीतील गिरण्यांना दोन महिन्यासाठी पुरेसा होता. एआरवाय न्यूजच्या म्हणण्यानुसार, या आश्वासनानंतर आटा कारखान्यांनी आंदोलन समाप्त केले होते.

पाकिस्तानातील वृत्तसंस्था दुनिया डेलीने सांगितले की, राष्ट्रीय लेखा समितीने चालू आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या राष्ट्रीय अर्थव्यवस्थेचा विकास दराची दिलेली आकडेवारी सर्वांसाठी धक्कादायक आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपीचे (विकास दर) ५ टक्के उद्दिष्ट निश्चित केले होते. वास्तविक वाढीचा दर ०.२९ टक्के सांगितला आहे. औद्योगिक क्षेत्राच्या विकासदराचे उद्दिष्ट ७.४ टक्के होते. मात्र, सध्या हा दर २.९४ टक्के आहे. चालू आर्थिक वर्षात महागाई ११.५ टक्के निर्धारित केली आहे. मात्र, दुनिया डेलीच्या रिपोर्टनुसार हा दर ३६.४ टक्के अशा उच्चांकावर पोहोचला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here