फैसलाबाद : सरकारने उत्पादक शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यापासून ऊस लागणीस सुरुवात करण्याची सूचना केली आहे. शेतकऱ्यांना जादा उत्पादन घेता यावे यासाठी उसाची लागण १५ मार्चपूर्वी पूर्ण करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
याबाबत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी उसाच्या मान्यताप्राप्त वाणांची लागवड जास्तीत जास्त प्रमाणात करावी. उसाच्या शिफारस केलेल्या जातींमध्ये सीपी ७७-४००, सीपी ७२-२०८६, सीपी ४३-३३, सीपीएफ २४३, एचएसएफ २४०, एसपीएसजी २६, एसपीएफ २१३, एसपीएफ २४५ आणि सीओजे ८४ या वाणांचा समावेश आहे.