लाहोर : यूटिलिटी स्टोअर्स कार्पोरेशनने स्थानिक साखर कारखान्यांकडून ४० हजार टन साखर खरेदीसाठी आणखी एक निविदा जारी केली आहे. यूटिलिटी स्टोअर्स कार्पोरेशनने १६ मार्चपूर्वी सीलबंद निविदा मागविल्या आहेत. बोलीधारक अथवा त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत या निविदा उघडल्या जातील.
यापूर्वी कार्पोरेशनने अंतिम निविदेअंतर्गत २० हजार टन साखर खरेदी करण्याचा निर्णय घेतला होत. साखर कारखान्यांनी ९२ रुपये प्रती किलो बोली लावली होती. यूटिलिटी स्टोअर्सने ८२ रुपये प्रति किलो दराने साखर आयात केली होती.
गेल्या सहा महिन्यांत ४०००० आणि ३५००० टन साखरेसाठी दोन स्वतंत्र निविदा जारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर कार्पोरेशनने एकूण १८०००० टनाच्या पाच निविदा रद्द केल्या होत्या. एका निविदेतील फक्त ४००० मेट्रिक टन साखरेची खरेदी करण्यात आली आहे. अलिकडेच निविदेअंतर्गत २०००० टन साखर खरेदीच्या बोली स्वीकारण्यात आल्या आहेत.