इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये महागलेल्या साखरेच्या दरावर नियंत्रण मिळविण्याचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. आता फेडरल शुगर अपील समितीने साखरेचा दर ८९.७५ रुपये प्रती किलो निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
साखर कारखानदारांशी झालेल्या चर्चेनंतर राष्ट्रीय अन्न सुरक्षा खात्याच्या संघ सचिवांनी याबाबत नियमाक आदेश (एसआरओ) जारी केला आहे. किमान २५ साखर कारखान्यांच्या मालकांनी एसआरओ १२५९च्या विरोधात अपील दाखल केले होते. त्यानंतर दोन संघ सचिवांच्या एका अपील समितीने २१ सप्टेंबर रोजी सरकारला साखरेची प्रती किलो किंमत निश्चित केल्याचे सांगितले होते. समितीने सात ऑक्टोबर रोजी सर्व साखर कारखान्यांना चार पानांच्या निर्णयाच्या प्रती दिल्या आहेत. त्यानुसार साखरेचा दर आता ८९.७५ रुपये प्रती किलो निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link