लाहोर : पाकिस्तानच्या ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सच्या (पीबीएस) माहितीनुसार, रविवारी देशभरात साखरेचा दर १०० रुपये प्रतिकिलोपेक्षाही अधिक स्तरावर पोहोचले. पीबीएसकडील आकेवारीनुसार, कराचीमध्ये साखरेची सर्वाधिक महाग, ११० रुपये प्रतिकिलो दराने विक्री केली जात आहे. तर इस्लामाबाद आणि रावळपिंडीमध्ये साखर १०५ रुपये किलो आहे.
देशातील सहा शहरांमध्ये साखरेचा दर वाढून १०० रुपये किलो झाल्याची माहिती पीबीएसने दिली. क्वेटा, बहावलपूर, मुल्तान, पेशावर आणि सियालकोटमध्ये साखरेचा दर १०० रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला. तर हैदराबादमध्ये याची किंमत ९८-१०० रुपये प्रतिकिलो आहे. फैसलाबादमध्ये साखर ९८ रुपये किलो आहे. पूर्ण देशात साखरेची सरासरी किंमत ९८ रुपयांवर पोहोचली असून खुजदारमध्ये ९७ रुपये तर सरगोधामध्ये ९६ रुपये किलो दराने साखर विक्री होत आहे.
सुक्कुरमध्ये साखरेची किंमत ९८ रुपये किलो असून लरकाना आणि बन्नूमध्ये ९५ रुपये प्रतिकिलो दराने साखर विक्री होत आहे