इस्लामाबाद : पाकिस्तानातील वाणिज्य, उद्योग आणि वस्त्र व उत्पादनाबाबत प्रधानमंत्र्यांचे सल्लागार अब्दुल रजाक दाऊद म्हणाले की, पाकिस्तान आता साखर निर्यात करणार नाही. साखर आता काही विशिष्ट परिस्थितीतच निर्यात केली जाईल. हे आता आमच्या निर्यातीच्या नित्य अजेंडावर असणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.
दाऊद असेही म्हणाले की, सरकार ग्राहकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त उपलब्ध करुन देणार आहे. यामुळे गरीब नागरीकांनाही त्रास होणार नाही. साखरेची निर्यात वर्षात उत्पादित साखरेच्या व्यापक तपासणीनंतरच केली जाईल. जर उत्पादन अधिक असेल तर साखरेची निर्यात केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्र्याचे सल्लागार म्हणाले की, पाक- चीन मुक्त व्यापाराचा करारही स्वीकारला, ज्याच्या अंतर्गत पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना साखर बाजारात 313 नव्या उत्पादनाच्या निर्यातीची संधी मिळेल. दोन्ही देशांनी कराराची कारवाई सुरु करण्यासाठी कायद्याचे प्रोटोकॉल आणि प्रक्रिया पूर्ण केली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.