पाकिस्तान करणार 300,000 टन साखरेची आयात

इस्लामाबाद :पाकिस्तान सरकारने साखरेच्या वाढत्या किमतीला नियंत्रीत करण्यासाठी 300,000 टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. साखरेच्या वाढत्या किमती बाजारात दबाव वाढवत आहेत, आणि यामुळे पाकिस्तानी नागरीक नाराज आहेत. साखर सल्लागार मंडळा (एसएबी) च्या बैठकीत काही दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला होता. यानंतर उद्योग मंत्रालय आणि उत्पादन मंत्रालयाने पाकिस्तान च्या ट्रेडींग कॉर्पोरेशन (टीसीपी) कडून हे निश्‍चित करण्यासाठी सांगितले की, साखरेच्या रणनितिक भंडाराला तसेच ठेवण्यासाठी 300,000 टन रिफाइंड साखरेची आयात केली जाईल.

पाकिस्तान सांख्यिकी ब्यूरो (पीबीएस) यांच्या नुसार वर्तमानात, 30 जानेवारी 2019 पर्यंत साखरेचे सरासरी मूल्य 79.06 रुपये किलोग्रॅम आहे. सरकारने महागाईवर ताबा मिळवण्यासाठी साखर निर्यात कोटा बंद करण्याचाही निर्णय घेतला आहे, आणि एसएबी ने वाणिज्य मंत्रालयाला यासाठी लवकरात लवकर ईसीसी ला संपर्क करण्याचे आदेश दिले आहेत. साखर सल्लागार मंडळाच्या बैठकी दरम्यान, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा सरकारच्या प्रतिनिधींनी खुलासा केला की, गेल्या वर्षात उस उत्पादनातील घसरणीमुळे वर्तमान गाळप हंगामात साखर उत्पादन कमी होण्याची आशा आहे. सध्या गाळप हंगाम सुरु आहे, याशिवाय राष्ट्रीय सरकारी किमती सतत वाढत आहेत. आयात केलेली साखर घरगुती साखरेच्या तुलनेत स्वस्त आहे. आणि या स्थितीला लक्षात घेता उद्योग आणि उत्पादन मंत्रालयाने टीसीपी ला साखरेच्या रणनीतिक भंडाराला तसेच ठेवण्यासाठी 300,000 टन साखर आयात करण्यासाठी सांगितले आहे.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here