लाहोर : पाकिस्तानमध्ये पंजाब प्रांताचे ऊस आयुक्त जमा वट्टू यांनी साखर कारखान्यंना साखर विक्रीचे विवरण न दिल्याबद्दल कडक कारवाईचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत साखरेच्या दरात तेजी दिसून आली आहे. साखरद दरातील ही तेजी आश्चर्यचकीत करणारी आहे असा दावा वट्टू यांनी केला. मार्चच्या अखेरच्या आठवड्यात गळीत हंगामाची सत्र समाप्ती झाली आहे. आणि साखर कारखान्यांसाठी एक्स मिल किंमत ७६.५० रुपये प्रती किलो निश्चित करण्यात आली आहे. ऊसाचा गळीत हंगाम समाप्त झाल्यानंतर दोन महिन्यांनी कारखान्यांकडून एक्स मील किंमत ८०.५० रुपये प्रती किलो वसूल केली जात आहे.
पंजाब साखर (पुरवठा-वितरण नियमन) आदेश, २०२१ आणि साखर कारखाना (नियंत्रण) अधिनियम १९५० अनुसार, साखर कारखान्यांनी डिलरना विक्री केलेल्या साखरेबाबतचे विवरण सादर करणे बंधनकारक आहे.
पुरवठा साखळीची निश्चिती आणि साठेबाजीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही माहिती गरजेची आहे. ऊस आयुक्त कार्यालयाने वारंवार मागणी करूनही साखर कारखान्यांनी विवरण उपलब्ध करून दिलेले नाही. साखर विक्रीचे विवदर न देण्यामुळे साठेबाजांना पाठबळ मिळत आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना पुन्हा एकदा विवरण उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यातून साठेबाजी रोखण्यात येणार आहे आणि साखरेचा दर स्थिर राहील. साठेबाजांना कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे.