पाकिस्तानमध्ये भारत सरकारप्रमाणेच नोटबंदी करण्याचा पाकिस्तानी अर्थतज्ज्ञाचा सल्ला

पाकिस्तान सध्या आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जात आहे. त्यातून बाहेर पडण्यासाठी त्याने मदतीचे आवाहनही केले आहे. यादरम्यान, आता एका पाकिस्तानी अर्थतज्ज्ञांनी डळमळीत अर्थव्यवस्था सांभाळण्यासाठी एक मोलाचा सल्ला दिला आहे. पाकिस्तान सरकारने ५,००० रुपयांच्या नोटा त्वरीत बंद केल्या पाहिजेत, असे त्यांनी सुचविले आहे.

आजतकमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, पाकिस्तानचे अर्थतज्ज्ञ अम्मार खान यांनी सध्याच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी आपल्या चलनातील ५,००० रुपयांच्या नोटा बंद करण्याचा सल्ला दिला आहे. याबाबत बिझनेस टुडेने म्हटले आहे की, या नोटा चलनातील सर्वाधिक मूल्याच्या आहेत. याबाबतच्या व्हायरल झालेल्या पोडकास्टमध्ये त्यांनी भारताच्या या फॉर्म्युल्याने जबरदस्त काम केल्याचे म्हटले आहे. त्यातून कर वसुलीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे, असा त्यांचा दावा आहे.
भारताने नोव्हेंबर २०१६ मध्ये देशात ५०० रुपये आणि १००० रुपयांच्या नोटा चलनातून रद्द केल्या होत्या. अम्मार खान यांच्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे की, पाकिस्तानच्या चलनात जवळपास ८ अब्ज कोटी रुपये तपासणीविना आहेत. त्यामुळे देशाचा खर्च वाढत आहे. कर मात्र, मिळत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here