पाकिस्तानी साखर उद्योगाचा सरकारला अल्टिमेटम : अतिरिक्त निर्यातीस परवानगी द्या अथवा साखर खरेदी करा

लाहोर : पाकिस्तान शुगर मिल्स असोसिएशनच्या (PSMA) पंजाब विभागाने सांगितले की, जर सरकारने साखर उद्योगाला १० लाख टन अतिरिक्त साखर निर्यात करण्याची परवानगी दिली नाही, तर अतिरिक्त साखर ११५ रुपये प्रती किलो दराने ही साखर खरेदी केली पाहिजे.

PSMA ने गावा केला की, साखर उद्योगाला संकटातून बाहेर काढण्यासाठी, शेतकऱ्यांना वेळेवर बिले देण्यासाठी निर्यात हा एकमेव पर्याय आहे. PSMA च्या प्रवक्त्याने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, साखरेच्या उत्पादन खर्चात इतर अनेक घटकांचा समावेश आहे. साखर तयार करण्याच्या प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या घटकांच्या दरात वाढ, बँकेच्या व्याज दरातील वाढ आणि ऊस समर्थन मूल्य ३०० रुपये प्रती ४० किलोग्रॅम करण्याचा सरकारचा निर्णय आदींचा समावेश आहे. त्यांनी सांगितले की, साखर कारखान्यांना शेतकऱ्यांना पैसे देणे मुश्किल होत आहे. ते म्हणाले की सरकारने या विषयाकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे आणि त्वरीत उपाय योजना करण्याची गरज आहे. अन्यथा कारखाने बंद करण्याशिवाय साखर उद्योगाकडे कोणताही पर्याय उरणार नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here