नवी दिल्ली :
पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याचीमुदत केंद्र सरकारने मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत आज संपत होती. मात्र आता या मुदतीत 31 मार्च 2020 पर्यंत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डने (सीबीडीटी) हा निर्णय घेतला असून आयकर विभागाने ही माहिती दिली आहे. पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्याची मुदत आठव्यांदा वाढवण्यात आली आहे.
आयकर विभाग अधिनियम, 1961 नुसार 139 एए (2) अंतर्गत आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक असणे गरजेचे आहे ,लिंक करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2019 निश्चित करण्यात आली होती. मात्र आता ही तारीख 31 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. आयकर विभागाने याबाबतचे ट्वीट केले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया (यूआयडीएआय) कडून भारतातील प्रत्येक नागरिकाला आधारकार्ड मिळते तर आयकर विभागाकडून पॅनकार्ड मिळते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.