बागपत : ऊस दराबाबत नाराज असलेल्या शेतकऱ्यांची दोघट येथे पंचायत झाली. जर लवकरच पैसे मिळाले नाहीत, तर शेतकरी आंदोलन सुरू करण्याचा निर्णय यावेळी झाला.
या बैठकीचे अध्यक्ष राजपाल शास्री म्हणाले, सरकारने ऊस दरात वाढ केलेली नाही. मात्र, शेतकऱ्यांना महागड्या दराने बियाणे, पाणी, खते, वीज दर यांना सामोरे जावे लागत आहे. सरकार शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत गंभीर नाही. या परिसरातील ऊस खरेदी करत असलेल्या भैसाना, किनौनी साखर कारखान्याने या हंगामातील ऊस बिले देण्यास अद्याप सुरुवात केलेली नाही. दौराला आणि खतौला या साखर कारखान्यांनी आठ जानेवारीपर्यंतची बिले अदा केली आहेत. भैसाना आणि किनौनी या साखर कारखान्यांनी आतापर्यंत गेल्या गळीत हंगामातील १० मेपर्यंतचीच ऊस बिले दिली आहेत. जर भैसाना आणि किनौनी साखर कारखान्यांनी जर पैसे दिले नाहीत आणि सरकारकडून ऊस दरात वाढ झाली नाही तर आंदोलन सुरू केले जाईल. यावेळी योगेंद्र, कुलदिप, पवेंद्र मुखिया, बसंत तोमर, मोनी, नरेंद्र राठी, बिजेंद्र, मनोज, ऋषिपाल, राजेंद्र, बिजेपाल, पवन राठी, प्रदीप धामा, इंद्रपाल, राजपाल आदी यावेळी उपस्थित होते.
वेळवर ऊस तोडणी पावती न मिळाल्याने आंदोलन
चमरावल गावातील ऊस खरेदी केंद्रावर गेल्या तीन दिवसांपासून उसाचे वजन केले जात नसल्याने शेतकऱ्यांनी निदर्शने केली. ऊसाची तोडणी पावती वेळेवर पाठवली जात नाही. ऊस अद्याप शेतातच आहे. त्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
चमरावल गावात मोदी साखर कारखान्याचे ऊस खरेदी केंद्र आहे. येथील शेतकरी केशव त्यागी, राधे यांनी सांगितले की, अद्याप उसाचा दर जाहीर झालेला नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी निदर्शने केली. जर यातून मार्ग निघाला नाही तर पुन्हा आंदोलनाचा इशारा देण्यात आला. राजेंद्र, मुखिया, देवराज, बिट्टू, मास्टर सतीश, श्यामसिंह, नीटू आदी आंदोलनात सहभागी होते.