टोडरपूर साखर कारखाना सुरु करण्याच्या मागणीबाबत बैठकीचे आयोजन

सहारनपूर, उत्तर प्रदेश: टोडरपूर मध्ये शाकंभरी साखर कारखाना क्षेत्रातील ऊस शेतकरी आणि कर्मचार्‍यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्यामध्ये बंद पडलेला साखर कारखाना सुरु करण्याच्या धोरणावर चर्चा करण्यात आली.

टोडरपूर मध्ये चौधऱी दिलशाद यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीमध्ये भागातील शेतकर्‍यांबरोबर कारखाना कर्मचारीही सामिल झाले. बैठकीमध्ये शेतकरी रफल सिंह यांनी सांगितले की, सात वर्षांपासून साखर कारखाना बंद पडला आहे. शेतकर्‍यांचे ऊसाचे पीक शेतात तयार आहे, पण कारखाना यावेळीही सुरु झाला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. त्यांनी सांगितले की, जर लवकर कारखाना सुरु झाला नाही तर शेतकरी आणि कारखाना कर्मचार्‍यांना नाइलाजाने आंदोलन करावे लागेल. बैठकीमध्ये चौधरी हाशिम अली, पदम शर्मा मंडल अध्यक्ष शेतकरी यूनियन, चौधरी अनवर, चमेल सिंह, रामकुमार प्रधान, चौधऱी दिलशाद, चौधरी अरशद, इमरान, नदीम, साजिद आदी उपस्थित होते.

 

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here