सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यात रोलर पूजन नुकताच झाला. यावेळी कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक म्हणाले कि, आगामी हंगामात साखर कारखाना प्रतिदिन नऊ हजार मेट्रिक टन क्षमतेने गाळप करणार आहे. ते म्हणाले कि, कारखाना कार्यक्षेत्रात १२ लाख मेट्रिक टन उसाच्या नोंदी झाल्या आहेत. नोंद झालेल्या सर्व उसाचे नियोजनबद्ध गाळप केले जाणार आहे. त्यासाठी ऊस तोडणी वाहतूक करार करण्यात आले आहेत.
प्रशांत परिचारक म्हणाले कि, मागील हंगामात कारखान्याने ९ लाख ६१ हजार १०० मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९ लाख ५५ हजार ५९० क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. त्याचबरोबर आसवनी प्रकल्पातून १.६० कोटी लिटर, को- जन प्रकल्पामधून ६.७१ कोटी युनिट वीजनिर्मिती करण्यात आल्याची माहितीही प्रशांत परिचारक यांनी दिली. यावेळी संचालक दिनकर मोरे, वंसतराव देशमुख, दिलीप चव्हाण आदि उपस्थित होते.