सोलापूर : राज्यातील सर्वच साखर कारखान्यांना सध्या तोडणी यंत्रणेची कमतरता जाणवू लागली आहे. कारखान्यास पूर्वी बीड, नगर, जालना, नंदुरबार जिल्ह्यांतील तोडणी मजूर मोठ्या प्रमाणावर मिळत होते; परंतु सध्या मजूर मिळण्याचे प्रमाण खूपच कमी झाल्याचा परिणाम गाळप क्षमतेवर होत आहे. ही अडचण वेळीच लक्षात घेत कारखाना व्यवस्थापनाने एस. फाम. कंपनीची पाच ऊस तोडणी यंत्रे खरेदी केली आहेत. आधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या या ऊस तोडणी यंत्रांचा शेतकरी, कारखान्याला मोठ्या प्रमाणात फायदा होईल, असे प्रतिपादन कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी केले.
कारखान्याने पाच ऊस तोडणी यंत्रांची खरेदी केली आहेत. त्यांचे पूजन वाखरी येथील प्रशासकीय कार्यालयासमोर चेअरमन प्रशांत परिचारक यांच्या हस्ते झाले. व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, संचालक दिनकर मोरे, वसंतराव देशमुख, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभूते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, दाजी पाटील, दिलीप गुरव, सीताराम शिंदे, श्यामराव साळुंखे, राणू पाटील आदी यावेळी उपस्थित होते. मागील दोन गळीत हंगामांचा आढावा घेतला असता ऊस तोडणीत मजुरांच्या टंचाईने अडचणी आल्याचे दिसले. त्यामुळे तोडणी यंत्रे खरेदी करण्यात आल्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.