सोलापूर : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याला तांत्रिक कार्यक्षमतेचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी ही माहिती दिली. व्हा. चेअरमन कैलास खुळे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी आदी उपस्थित होते. पुरस्काराचे वितरण ऑगस्टमध्ये होणार आहे. स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या तत्त्वानुसार कारखाना सुरू आहे. गाळप हंगाम २०२२ – २३ मध्ये तांत्रिक कामकाजामध्ये कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे हा पुरस्कार मिळाला आहे. कारखान्याची पुरस्कार मिळण्याची मालिका अखंडितपणे सुरू आहे, असे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी सांगितले.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, कारखान्याकडून कधीही शेतकऱ्यांची, व्यापाऱ्यांची, बँकांची देणी थकीत नाहीत. त्यामुळे कारखान्यास प्रत्येक वर्षी देशपातळीवरील व राज्यपातळीवरील नामांकित पुरस्काराने सन्मानित केले जाते. चेअरमन प्रशांत परिचारक, व्हा. चेअरमन कैलासराव खुळे व संचालक, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळेच हे शक्य झाले. यावेळी संचालक दिनकरराव मोरे, दिलीपराव चव्हाण, उमेशराव परिचारक, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे, सीताराम शिंदे, दिलीप गुरव, शामराव साळुंखे, राणू पाटील, दाजी भुसनार आदी उपस्थित होते.