पांडुरंग साखर कारखान्यास ‘को-जन इंडिया’तर्फे बेस्ट को-जनरेशन पुरस्कार

पंढरपूर : को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडिया तर्फे कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्यास को-जनरेशन प्रकल्पाला देशपातळीवरील प्रथम क्रमांकाचा बेस्ट को-जनरेशन प्रकल्प पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कारखान्याच्या चार अधिकाऱ्यांचा विविध पुरस्काराने गौरविण्यात आले. पुणे येथे खा. शरद पवार, जयप्रकाश दांडेगावकर, नरेंद्र मोहन, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ आदी मान्यवरांच्या हस्ते झाला. कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक भगवान चौगुले, तानाजी वाघमोडे व कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, आदींनी पुरस्कार स्वीकारला.

कारखान्याचे अधिकारी सचिन विभुते को-जन मॅनेजर यांना बेस्ट को- जन मॅनेजर (स्पेशल), समीर सय्यद बेस्ट इन्स्ट्रूमेंट मॅनेजर, बाळासाहेब होरे यांना बेस्ट इलेक्ट्रिक मॅनेजर तसेच सत्यवान जाधव यांना बेस्ट ई.टी.पी. मॅनेजर असे पुरस्कार मिळाले आहेत. गळीत हंगाम २०२२-२३ मध्ये कारखान्याच्या को-जनरेशन प्रकल्पा विस्तारीकरण केले असून या हंगामापासून को-जनरेशन प्रकल्प वाढीव क्षमतेने चालणार असल्याची माहिती चेअरमन प्रशांत परिचारक यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here