पानीपत : साखर कारखान्यातील गाळप पुन्हा एकदा बंद पडले आहे. त्यामुळे ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना नऊ तास ताटकळत बसावे लागले. कारखान्याच्या टर्बाइनमध्ये मंगळवारी रात्री बिघाड झाल्यानंतर बुधवापर्यंत त्याची दुरुस्ती करण्यात आली.
साखर कारखान्याच्या टर्बाइनमद्ये यापूर्वीही तांत्रिक त्रुटी दिसून आल्या आहेत. मात्र, यावेळी इंजिनीअर्सनी तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेऊन ते लवकर पूर्णत्वास जाण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मोठ्या अडचणींतून कारखान्याची सुटका झाली आहे. कारखान्यात आतापर्यंत १२ लाख ५ हजार टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्यात तांत्रिक अडचणी वाढल्याने आता विविध शिफ्ट्मध्ये इंजिनीअर्सची टीम पाहणी करत आहे. याशिवाय रात्री मेन्टेनन्सचेही काम हाती घेण्यात आले आहे.
सध्या गाळपास येणाऱ्या ऊसात सातत्याने वाढ होतआहे. कारखाना कार्यस्थळावर सुमारे ३५० हून अधिक ट्रॉली ऊस घेऊन थांबल्या आहेत. जर पुन्हा यंत्रसामुग्रीत बिघाड झाला तर अडचणी वाढू शकतात.
दरम्यान, साखर कारखान्याच्या टर्बाइनमध्ये बिघाड झाला होता. मात्र, त्याची दुरुस्ती वेळीच करण्यात आली आहे. कारखाना नऊ तास बंद राहीला. आता कामकाज सुरळीत आहे असे जिंद साखर कारखान्याचे केन मॅनेजर रसविंद्र सिंह यांनी सांगितले.