वैद्यनाथ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पंकजा मुंडे

बीड : परळी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे. कारखान्याच्या अध्यक्षपदी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांची तर उपाध्यक्षपदी चंद्रकांत कराड यांची निवड करण्यात आली आहे. कराड हे धनंजय मुंडे यांचे समर्थक मानले जातात.

वैद्यनाथ साखर कारखान्याच्या स्थापनेपासून कारखान्यावर गोपीनाथ मुंडे गटाचे वर्चस्व आहे. मुंडे यांच्या निधनानंतर कारखान्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांनी सांभाळली आहे. निवडणूक बिनविरोध करण्यात भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here