बीड : भाजप नेत्या आणि माजीमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा ऊसतोड मजुरांसाठी आवाज उठवला आहे. त्या म्हणाल्या की,ऊसतोड मजुरांना जरुर न्याय मिळेल. कोरोनाला पहता देशभरामध्ये लागू केलेल्या लॉकडाउनने सर्व क्षेत्रांना प्रभावित केले आहे. पंकजा मुंडे म्हणाल्या की, अशा अवस्थेत त्या मजुरांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहेत. याची माहिती त्यांनी ट्वीटर च्या माध्यमातून दिली आहे.
त्यांनी एका ट्वीटमध्ये सांगितले की, माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जेष्ठ नेते मा.खा.शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी ना.जयंत पाटीलजी, साखर संघाचे अध्यक्ष मा.जयप्रकाश दांडेगावकरजी यांच्याशी चर्चा करणार आहे.
माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी सन्माननीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, जेष्ठ नेते मा.खा.शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी ना.जयंत पाटीलजी, साखर संघाचे अध्यक्ष मा.जयप्रकाश दांडेगावकरजी यांच्याशी चर्चा करणार आहे.
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 7, 2020
देशामध्ये अचानक लागू झालेल्या लॉकडाउन दरम्यान कामासाठी घरातून दूर गेलेले मजुर राज्याच्या विविध भागात अडकले होते. तेव्हाही, पंकजा मुंडे यांनी मजुरांच्या परिस्थितीकडे सरकारचे लक्ष आकर्षित केले होते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.