परभणी : उसाला सरसकट प्रतिटन २,७०० रुपये भाव मिळावा, यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने अध्यक्ष, माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली परभणी- गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दोन तास चाललेल्या या आंदोलनानंतर जिल्ह्यातील सात साखर कारखानदारांनी प्रतिटन २,७०० रुपये भाव देण्याचे जाहीर केले. त्यानंतर हा रास्ता रोको ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून मागे घेण्यात आला.
जिल्ह्यातील उसाला सात पैकी दोन कारखानदारांकडून २,४०० ते २,५०० प्रतिटन भाव देण्यात येत होता. त्यामुळे सातही कारखान्यांनी उसाला २,७०० रुपये प्रति टनाचा भाव द्यावा, यासाठी बुधवारी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला यश आल्यानंतर जिल्ह्यात यावर्षी जवळपास ३२ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप होणार आहे. यापोटी सुधारित भावाने जवळपास ६४ कोटी रुपये शेतकऱ्यांना मिळणार आहेत.
कारखान्यांच्या प्रतिनिधींनी शेट्टी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर बराच वेळ चाललेल्या चर्चेदरम्यान उसाला प्रतिटन २,७०० रुपये भाव देण्याची हमी यावेळी देण्यात आली. त्यानंतर शेट्टी यांच्याकडून रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात किशोर ढगे, दीपक लिपणे, रामप्रसाद गमे, गजानन तुरे, रामराजे महाडिक, प्रसाद गरुड, मुंजा लोडे, पंडित भोसले, तानाजी भोसले, रुपेश शिंदे, शेख चाँद, विकास भोपळे, गजानन दुगाने, माऊली शिंदे, मयूर वाघमारे, नागेश दुधाटे, सचिन शिंदे आदींसह कार्यकर्ते व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गत दोन महिन्यांपासून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने…
जिल्ह्यातील उसाला २,७०० रुपये प्रति टन भाव देण्यात यावा, या मागणीसाठी गत दोन महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलने सुरू आहेत. या आंदोलनाचा धसका घेऊन जिल्ह्यातील सात पैकी पाच कारखान्यांनी हा भाव देऊ, असे जाहीर केले. परंतु, जिल्ह्यातील दोन कारखान्यांचे प्रशासन हे भाव देण्यास तयार नव्हते. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी परभणी गंगाखेड रस्त्यावरील शिंगणापूर फाटा येथे शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दुपारी १२ वाजता सुरू झालेले हे रास्ता रास्ता रोको आंदोलन दोन तास चालले. या आंदोलनादरम्यान त्या दोन साखर