पॅरिस ऑलिम्पिक: कोल्हापूरचा सुपुत्र स्वप्नील कुसाळे याने पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात कांस्यपदकावर नाव कोरले

Chateauroux [फ्रान्स]: भारतीय नेमबाज स्वप्नील कुसाळे पॅरिस ऑलिंपिकमध्ये पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत कांस्यपदक जिंकले. तो खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू ठरला आहे.पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये भारताने एकूण तीन पदके जिंकली आहेत. तिन्ही पदके नेमबाजीत आली आहेत.स्वप्नीलपूर्वी मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्यपदक जिंकले होते.त्याचवेळी सरबज्योतसह मनूने १० मीटर एअर पिस्तूल मिश्र प्रकारात कांस्यपदक जिंकले.

कुसाळे 50m रायफल 3P स्पर्धेत पदक जिंकणारा पहिला भारतीय नेमबाज ठरला आहे. स्वप्नील ने स्पर्धेत पुरुषांच्या अंतिम फेरीत एकूण ४५१.४ गुणांसह तिसरे स्थान पटकावत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. त्याने नेमबाजीत भारताचे तिसरे पदक निश्चित केले.याआधी स्वप्नील ने बुधवारी पुरुषांच्या 50 मीटर 3पी स्पर्धेच्या पात्रता फेरीत सातवे स्थान मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. यापूर्वी भारतीय नेमबाज मनू भाकरने महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकून देशाचे खाते उघडले होते. २००४ मध्ये सुमा शिरूरनंतर ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक स्पर्धेत नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी पहिली भारतीय महिला ठरून तिने इतिहास रचला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here