लखनौ : Parle Biscuits उत्तर प्रदेशमधील परसेंडी येथे आपल्या साखर कारखान्याची क्षमता ४,८५० टीसीसीपीडीहून वाढवून ८,००० टीसीसीपीडी करणार आहे.
याबाबत, प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, एक्सेल इंजिनीअरिंग हे या प्लांटसाठी यंत्रसामुग्रीचे ठेकेदार आणि पुरवठादार आहे. कारखान्याच्या विस्तारानंतर जवळपास आणखी २० कर्मचारी कामावर घेतले जातील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचे जवळपास ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे. आणि विस्ताराचे काम २०२३ पर्यंत पूर्ण केले जाईल.