पारनेर साखर कारखाना गैरव्यवहार : आरोपींना अटक करण्याच्या मागणीसाठी पोलिस ठाण्यासमोर उपोषण

अहिल्यानगर : पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या विक्री प्रकरणात गैरव्यवहार करणाऱ्यांना अटक करावी या मागणीसाठी सोमवारी कारखाना बचाव समितीने येथील पोलिस ठाण्यासमोर उपोषण सुरू केले आहे. फिर्यादी रामदास घावटे यांच्यासह बबन कवाद, साहेबराव मोरे, संभाजी सालके, रघुनाथ मांडगे, संजय वाखारे, रामदास सालके, गोविंद बडवे, सुनील चौधरी यांच्यासह कारखाना बचाव समितीचे सदस्य उपोषणात सहभागी झाले आहेत.

कारखान्याच्या गैरव्यवहारात शुगर कंपनीचे नऊ संचालक व महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे २ वरिष्ठ अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन दहा दिवस उलटले तरीही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पारनेर पोलिसांकडून तपास काढून आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करावा व आरोपींना अटक करावी अशी मागणी बचाव समितीने केली आहे. या गुन्ह्यातील घोटाळ्याची व्याप्ती सुमारे ३०० ते ४०० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. याबाबत उपोषणकर्ते रामदास घावटे म्हणाले की, गुन्हा दाखल होऊन १० दिवस उलटले तरी तपासी अधिकाऱ्याकडून पुढे काहीच तपास झालेला नाही. शासनाने एसआयटीची स्थापना करावी, अशी आमची मागणी आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here