सांगली: राजारामबापू सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्पाच्या उभारणीचे काम सुरू असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी दिली. साखराळे येथे कारखान्याच्या गळीत हंगाम २०२४-२५ चा रोलर पूजन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्ष प्रतीक पाटील यांच्या हस्ते रोलप पूजन झाले. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष विजयराव पाटील, ज्येष्ठ संचालक बाळासाहेब पवार, कार्तिक पाटील, विठ्ठलतात्या पाटील, प्रदीपकुमार पाटील, कार्यकारी संचालक आर. डी. माहुली प्रामुख्याने उपस्थित होते.
दरम्यान,कारखान्याच्यावतीने ठेवीतील पैसे सभासद शेतकऱ्यांना परत देण्यास सुरुवात केल्याची माहितीही अध्यक्ष पाटील यांनी दिली. ते म्हणाले की,कारखान्याने २०१४-१५ साली घेतलेल्या प्रती टन रुपये १४७ या ऐच्छिक ठेवीतील प्रतिटन ७५ रुपये गेल्यावर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये परत दिले आहेत. उर्वरित प्रती टन ७२ रुपयांप्रमाणे एकूण ११ कोटी ८४ लाख लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जयंतीदिनी, एक ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग करत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.संचालक रघुनाथ जाधव, बबनराव थोटे, दादासाहेब मोरे, प्रतापराव पाटील, मेघा पाटील, शैलेश पाटील, प्रा. डॉ. योजना शिंदे-पाटील, दिलीपराव देसाई, हणमंत माळी, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.