कोल्हापूर, ता. 12 : ऊस तोड मजूरांना घरी जाण्यासाठी एक-दोन दिवसाचे लॉकडाऊन शिथिल करण्याचे आवाहन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चर्चा करु अशी ग्वाही ज्येष्ठनेते शरद पवार यांनी आज सांगितले. सीटू कामगार संघटनेच्यावतीने राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांच्याशी दुरूध्वनीवरुन चर्चा केली.
डॉ कराड म्हणाले, ऊस तोड मंजूरांना घरी जाता यावे यासाठी ज्येष्ठनेते शरद पवार यांच्याशी आताच चर्चा झाली. ऊस तोड कामगार राज्यातील विविध जिल्ह्यात आहेत. संचारबंदी आणि लॉकडाऊनमूळे त्यांना आपल्या घरी परत जाता येत नाही. यासाठी त्यांचे दैनंदिन जीवनाचे हाल होत आहे. यापार्श्वभूमीवर या साखर कारखान्यांच्या कामगारांना त्यांना त्याच्या घरी जाता यावे यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन श्री पवार यांना केले होते. यावर श्री पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन एक दोन दिवसाचे लॉक डाऊन शिथिल करण्याबाबत आवाहन केले जाईल. ऊस तोड मजूर आपआपल्या गावी गले पाहिजे. सुरक्षितात बाळगूनच त्यांचा प्रवास झाला पाहिजे. यासाठी प्रयत्न केले जीतील असेही ते म्हणाले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.