कुरुक्षेत्र : शाहाबाद सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२०-२१ मध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या ऊसाचे शंभर टक्के पैसे अदा केले आहेत. हरियाणा शुगर फेडरेशनचे चेअरमन तथा शाहाबादचे आमदार रामकरण काला यांनी याबाबत कारखान्याचे कार्यकारी संचालक विरेंद्र चौधरीसह अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
आमदार काला म्हणाले, गळीत हंगामात कारखान्याने शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ दिली नाही. ऊस बिलेही वेळेवर दिली गेली. कारखान्याचे कार्यकारी संचालक विरेंद्र चौधरी यांनी सांगितले की, कारखान्याने चालू हंगामात ७६.८१ लाख क्विंटल उसाचे गाळप करून ८.४३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले. याशिवाय ४.८० कोटी युनिट विजेचे उत्पादन करून ती हरियाणा विद्यूत वितरण महामंडळाला देण्यात आली. कारखान्यात ६० किलो लिटर प्रती दिन क्षमतेच्या इथेनॉल प्लांटचे काम प्रगतीपथावर आहे. लवकरच ते पूर्ण होईल असे चौधरी म्हणाले. तर कोरोना काळात कारखान्याने कोविड सेंटर आणि आयसोलेशन सेंटरची सुविधा दिली.
कोरोना काळात कारखान्याने प्रशासनाच्या सूचनेनंतर २५ बेडचे कोविड केअर सेंटर सुरू केले. याशिवाय कारखान्याच्या कॉलनीत दहा बेडचे आयसोलेशन सेंटरही सुरू केले असे विरेंद्र चौधरी यांनी सांगितले. या कामासाठी प्रशासन अभिनंदनास पात्र आहे असे ते म्हणाले. यावेळी कंवरपाल, रिंकू कठवा उपस्थित होते.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link