मेरठ : आयपीएलच्या सकौती साखर कारखान्याने गुरुवारी, पाच फेब्रुवारीपर्यंत खरेदी केलेल्या ऊसाची बिले संबंधीत समित्यांकडे पाठविली आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आयपीएल साखर कारखाना सकौतीचे व्यवस्थापकीय संचालक दीपेंद्र कुमार खोखर यांनी सांगितले की, ११ कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. त्यांनी समित्यांकडे एडवाइज पाठविली आहेत. साखर कारखान्याचे ऊस विभागाचे प्रमुख यतेंद्र पवार यांनी शेतकऱ्यांनी कारखान्याला साफ, स्वच्छ ऊसाचा पुरवठा करावा, असे आवाहन केले आहे.