सोलापूर : श्री संत दामाजी साखर कारखान्याने कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप करून गळीत हंगाम ८ मार्च रोजी बंद केला आहे. कारखान्यासमोर आर्थिक अडचणी असतानाही सभासद शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहण्यासाठी हंगाम अखेर गळितास आलेल्या संपूर्ण उसाची बिले, ऊस तोडणी, वाहतुकीची बिले अदा करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन शिवानंद पाटील यांनी दिली.
चेअरमन पाटील म्हणाले की, कारखान्याने चालू गळीत हंगामातील दि. १ ते १५ फेब्रुवारी या कालावधीत गाळप केलेल्या उसाचे बिल २७०१ रुपयांप्रमाणे संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केले आहे. ऊस तोडणी, वाहतूक बिलेही दिली जात आहेत. तर सर्व बिले ३१ मार्चअगोदर देण्यार्च व्यवस्था करीत आहोत, असे त्यांनी सांगितले. चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्ता, गौरीशंकर बुरकूल गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाक पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, बसवराज पाटील गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे महादेव लुगडे, तानाजी कांबळे, तानाजी काकडे, सुरेश कोळेकर, प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय आदी यावेळी उपस्थित होते.