मवाना : मवाना साखर कारखान्याने १५.५० कोटी रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांच्या बँक खात्यांवर पाठविली आहेत. कारखान्याने सात फेब्रुवारी २०२१ अखेर खरेदी केलेल्या उसाची बिले अदा केली आहेत.
मवाना साखर कारखान्याने आतापर्यंत एकूण खरेदी केलेल्या ऊसाच्या ५३ टक्के पैसे दिले आहेत. कारखान्याचे ऊस आणि प्रशासन विभागाचे महा व्यवस्थापक प्रमोद बालियान यांनी गळीत हंगाम २०२०-२१ साठी सहकार्य केलेल्या सर्व शेतकऱ्यांचे आभार व्यक्त केले. साखर कारखाना शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले योगदान देत राहील. ऊसाचे उर्वरीत पैसेही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवले जातील. साखर विक्रीतून मिळणारे ८५ टक्के पैसे ऊस बिलांसाठी दिले जात असल्याचे ते म्हणाले. याशिवाय कारखान्याने कार्यक्षेत्रात ऊसाचे सर्वेक्षणही सुरू केले आहे. ऊस विभागाच्या निर्देशानुसार, शेतकऱ्यांना ऑनलाईन घोषणापत्र भरावे आणि ऊसाच्या सर्व्हेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.