यह न्यूज़ सुनने के लिए इमेज के निचे के बटन को दबाये
गोंदा (उत्तर प्रदेश) : चीनी मंडी
उत्तर प्रदेशात ऊस बिल थकबाकीचा प्रश्न ऐरणीवर आला असून, साखर कारखाने आता अडचणीत आले आहेत. प्रशासनाने जिल्ह्यातील साखर कारखान्यांना येत्या २० फेब्रुवारीपर्यंत गेल्या वर्षीची ऊस बिले भागवन्यास सांगितले आहे, अन्यथा कारखान्यावर कारवाई करू, असा इशारा दिला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्याही आशा पल्लवित झाल्या आहे.
देवीपाटण मंडळाचे आयुक्त सुधेश कुमार ओझा यांनी त्यांच्या कार्यालयात साखर कारखान्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन ऊस बिलांचा आतापर्यंतच आढावा घेतला. इटई मैदा आणि कुंदुरुखी साखर कारखान्याने २०१७-१८च्या हंगामातील पूर्ण ऊस बिल भागवले आहे, अशी माहिती उपायुक्त अमर सिंह यांनी दिली. चिलवरिया साखर कारखान्यावर गेल्या दोन वर्षांपासून ४२ कोटी रुपये थकबाकी आहे. यंदाच्या हंगामात साखर कारखान्याचे ५५३ कोटी रुपये थकीत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ऊस बिले भागवली जावीत आणि त्यात कोणत्याही प्रकारचा हलगरजीपणा चालणार नाही, असे मंडल आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
अधिकाऱ्यांनी ऊस बिलांचा आढावा घेताना बिले पंधरवड्याला देण्याचे निर्देश दिले. मंडल आयुक्तांनी त्या संदर्भात एक अहवाल मागविला असून, गेल्या वर्षीचे ऊस बिल २० फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यांच्या खात्यांवर जमा करण्याचे आदेश दिलेआहेत. अन्यथा कारखान्यांना कारवाईला समोरे जावे लागण्याचा इशाराही त्यांनी दिला. गेल्या पंधरा दिवसांत साखर कारखान्यांनी २५० कोटी रुपयांची ऊस बिले भागवली आहेत. तसेच ऊस कारखान्याला दिल्यानंतर त्याची पावती वेळेवर शेतकऱ्यांना मिळत नसल्याबद्दल मंडल आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. त्यांनी जिल्हा ऊस अधिकाऱ्यांना यात लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
डाउनलोड करे चीनीमंडी न्यूज ऐप: http://bit.ly/ChiniMandiApp