मागील हंगामातील जादा ४०० रुपये द्या, मगच ऊस तोडा : राजू शेट्टी

कोल्हापूर : राज्यातील सर्वच कारखान्यांकडील साखरेला गेल्या हंगामात ४०० रुपये जादा दर मिळाला आहे. हे पैसे शेतकऱ्यांचे आहेत. ते त्यांना मिळाले पाहिजेत. ते पैसे देण्यासह यंदाच्या गळीत हंगाात उसाला योग्य दर देवूनच साखर कारखान्यांनी ऊसतोड करावी, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, राजू शेट्टी यांनी दिला. पन्हाळा तालुक्यातील आक्रोश पदयात्रेदरम्यान आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जयवंत भैया पाटील होते.

माजी खासदार शेट्टी म्हणाले की, शेट्टी म्हणाले, मागील हंगामात साखर कारखानदारांनी ३३०० रुपयांची साखर ३८०० रुपयांना विकली. ऊस उत्पादन कारखान्याचे मालक असताना त्यांचे रुपये ४०० तुम्ही का अडवता ? जिल्ह्यातील ३७ कारखान्यांनी ३ कोटी टन ऊस गाळप केले आहे. त्यामुळे १७ लाख शेतकऱ्यांना १२०० कोटी रुपये मिळाले पाहिजेत. त्यासाठी लढा तीव्र केला जाईल. त्यासाठी शेतकऱ्यांनी मला साथ द्यावी. दरम्यान, या परिसरातील एका खासगी कारखान्याचे मालक शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दमदाटी करतात. कार्यकर्त्यांना धमकी दिली तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. यावेळी प्रा. जालंदर पाटील, दगडू गुरवळ, धनाजी बोरगे, नंदकुमार बुराण, पडळच्या सरपंच सविता केकलेकर, जनार्दन पाटील, बाळू कोठावळे, बाळू पाटील, महादेव झेंडे आदी उपस्थित होते. दिलीप अतिग्रे यांनी प्रास्ताविक केले. नवनाथ पाटील यांनी सूत्रसंचालन केले. सुधाकर पाटील यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here