मेरठ : ऊस उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली किनौनी आणि मलियानाशी संलग्न शेतकऱ्यांनी ऊस दराबाबत आंदोलन केले. ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकीत बिले आणि इतर समस्या सोडविण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
विजेंद्र प्रमुख यांच्या नेतृत्वाखाली संघर्ष समितीचे सदस्य ऊस भवनात पोहोचले. तेथे शेतकऱ्यांनी थकीत बिले देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी सांगितले की, किनौनी साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला जातो. मात्र, हंगामाच्या अखेरीस विविध कारणे पुढे करत ऊस पूर्ण खरेदी करण्याआधीच कारखाना बंद केला जातो. शेतकऱ्यांचा सर्व ऊस किनौनी कारखान्याला घेतला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या ऊस मिळेल त्या किमतीवर गुऱ्हाळघरांना विकावा लागतो.
किनौनी कारखाना वेळेवर शेतकऱ्यांना ऊस बिले देत नसल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला. या मागण्यांबाबत शेतकऱ्यांसोबत बैठक घेण्यात आली. शेतकऱ्यांनी थकीत ऊस बिले व्याजासह देण्याची मागणी केली. शेतकऱ्यांनी ऊस दर ४०० रुपये क्विंटल जाहीर करावा अशी मागणी केली. तसेच शेतकऱ्यांची गरज ओळखून ऊस विक्री केंद्रे आणि दुसऱ्या साखर कारखान्याला पाठवला जावा असा आग्रह धरला. ऊस अधिकाऱ्यांनी याबाबत योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. जिल्हा ऊस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्वीकारले. शेतकऱ्यांनी कारखान्यावर कारवाई करण्याची मागणी ऊस आयुक्तांकडे केली.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link