दौराला : दौराला साखर कारखान्याच्यावतीने सोमवरी गळीत हंगाम २०२२-२३ साठी खरेदी केलेल्या उसापोटी बिले देण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, साखर कारखान्याने २८ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत खरेदी करण्यात आलेल्या उसापोटी बिले ऊस समित्यांना पाठविण्यात आली आहेत. कारखान्याचे वरिष्ठ महाव्यवस्थापक संजीव कुमार यांनी सांगितले की, सध्याच्या गळीत हंगामातील ऊस बिले देणारा दौराला साखर कारखाना उत्तर प्रदेशातील पहिला कारखाना बनला आहे. त्यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या मालकांनी गळीत हंगाम सुरू केल्यानंतर लवकर ऊस बिले देण्याचा निर्णय जाहीर केला होता, हे आश्वासन पूर्ण करण्यात आले आहे. कारखान्याच्या वरिष्ठ महाव्यवस्थापकांनी सांगितले की, शेतकऱ्यांनी कारखान्याला स्वच्छ उसाचा पुरवठा करावा.