लखीमपुरखीरी : डीसीएम श्रीराम समुहाचा साखर कारखाना असलेल्या अजबापूर युनिटने गळीत हंगाम २०२०-२१ या मध्ये खरेद केललेल्या १६१ लाख क्विंटल उसापोटी ५२३.६२ कोटी रुपये शेतकऱ्यांना अदा केले आहेत. शेतकऱ्यांना शंभर टक्के ऊस बिले कारखान्याने दिली आहेत. शंभर टक्के ऊस बिले मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
युनिटचे प्रमुख पंकज सिंह यांनी सांगितले की, अधिक उत्पादन देणाऱ्या ऊसाची निवड शेतकऱ्यांनी करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय लाल सड रोगापासून बचाव होण्यासाठी शेतकऱ्यांनी उसाची बांधणी करावी, रोटरने कामे करावीत. या वर्षीच्या उसाचे सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याची माहिती त्यांनी दिली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ऑनलाईन घोषणापत्र भरावेत. घोषणापत्र नसेल तर उसाची खरेदी केली जाणार नाही असेही पंकज सिंह यांनी यावेळी स्पष्ट केले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link