‘वसाका’च्या कामगारांची ५ कोटी ८६ लाखांची थकबाकी द्या : स्वाभिमानी शेतकरी संघटना

नाशिक : राज्य सहकारी बँक व धाराशिव उद्योग समूहाने वसाकाच्या कामगार थकबाकी संदर्भात तत्काळ कार्यवाही करावी. धाराशिव प्रशासनाने गेल्या ५ वर्षांपासून कामगारांच्या देय रकमा जमा केलेल्या नाहीत. एकूण ५ कोटी ८६ लाख रुपयांची थकबाकी धाराशिव प्रशासनानाकडे आहेत. ती त्वरीत न दिल्यास पंढरपूर येथील निवासस्थानी जाऊन धरणे आंदोलन करू, असा इशारा कामगारांनी दिला. थकबाकी मिळण्यासंदर्भात चर्चेसाठी ८ जानेवारी रोजी बैठक झाली. यावेळी धाराशिव उद्योग समूहाने कारखाना भाडेतत्त्वावर सुरू केला. परंतु त्यांना तो व्यवस्थित चालवता आला नाही. यात कामगारांचा काहीही दोष नसल्याचे म्हणणे मांडण्यात आले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समन्वयक कुबेर जाधव यांनी सांगितले की, कामगारांचे शेवटच्या ५ महिन्यांचे वेतन दिलेले नाही. याप्रश्नी आम्ही सर्व वसाकाचे शेकडो कामगार धाराशिव उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अभिजित पाटील यांची भेट घेऊन त्यांना साकडे घालतील. त्यानंतरही प्रश्न सुटला नाही तर कायदेशीर कारवाई करण्याशिवाय पर्याय नाही. यावेळी वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष, सरचिटणीस यांसह इतर युनियनचे सदस्य हजर होते. यावेळी वसाका मजदुर युनियनमध्ये सप्तसुंर्गी कामगार संघटनेने अध्यक्ष विलास सोनवणे, हिरामण बिरारी, सतिश शिरोडे यांचा समावेश करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here