वेळेवर थकबाकी भागवा अन्यथा कारवाईसाठी तयार रहा: डीएम

बिजनौर : डीएम रमाकांत पांड्ये यांनी ऊस थकबाकी भागवण्याची समिक्षा बैठक़ आयोजित केली. गेल्या आठवड्यातील लक्ष्याच्या अनुसार थकबाकी न भागवणार्‍या कारखान्यातील अधिकार्‍यांना डीएम यांनी फटकारले. त्यांनी सांगितले की, पुढच्या आठवड्याच्या लक्ष्यानुसार थकबाकी न भागवणार्‍या कारखान्यांच्या अधिकार्‍यांविरोधात कडक कारवाई केली जाईल.

धामपूर कारखान्याने 20 करोड च्या सापेक्ष 12.45 करोड, स्योहारा साखर कारखान्याने 28.95, बिलाई ने दहाच्या सापेक्ष 6.30, बहादुरपूर व बुंदकी ने पाच पाच करोड च्या थकबाकीच्या सापेक्ष शून्य, बरकातपूर कारखान्याने सात च्या तुलनेत 7.28, चांदपूर ने चारच्या तुलनेत 3.52, बिजनौर ने चार च्या तुलनेत 4.10 आणि नजीबाबाद ने पाच च्या तुलनेत केवळ 1.90 करोड इतकेच देय भागवले आहे. 75 करोड च्या लक्ष्याच्या तुलनेत 65.91 करोड रुपयांचेच देय भागवण्यात आले आहे. डीएम म्हणाले की, ऊस थकाबकी भागवण्यसाठी शासन कडक पावले उचलत आहे. शेतकर्‍यांच्या ऊस थकबाकी भागवण्याबाबतची टाळाटाळ सहन केली जाणार नाही. कारखान्याने वेळेत पैसे द्यावेत अन्यथा कारवाईसाठी तयार रहावे. या आठवड्यासाठी धामपूर आणि स्योहारा साखर कारखान्याला 15-15 करोड, बिलाई, बहादुरपूर, बुंदकी आणि बरकातपूर कारखान्याला 10-10 करोड, चांदपूर, बिजनौर आणि नजीबाबाद कारखान्याला पाच-पाच करोड देय भागवण्याचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह, धामपूर कारखान्याचे एमआर खान, कुलदीप शर्मा, अजय शर्मा, परोपकार सिंह, इसरार अहमद, प्रवीण सिंह, बलवंत सिंह, एसएस ढाका, अजय ढाका आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here